केसांच्या समस्या व आयुर्वेदिक उपाय :
सौंदर्य ही संकल्पना केवळ त्वचापुरती मर्यादित नाही. लांब, काळेभोर आणि चमकदार केस हे देखील सौंदर्यात भर घालतात. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्त्री-पुरुष दोघांनाही विविध केसांच्या समस्या भेडसावत आहेत.
प्रश्न 1: सध्या स्त्रिया व पुरुष दोघांमध्येही केस गळती आणि इतर समस्या वाढल्या आहेत. याचे प्रमुख कारण काय आहे?
उत्तर:
होय. आजकाल केसांच्या समस्या म्हणजे केस गळणे, पांढरे होणे, कोंडा, चाई पडणे, कोरडेपणा इत्यादी स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्येही वाढल्या आहेत. यामागे अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, आणि मानसिक तणाव ही प्रमुख कारणे आहेत.
प्रश्न 2: केसांची ही स्थिती बिघडण्यामागे आणखी कोणकोणती कारणे आहेत?
उत्तर:
अनुवंशिकता (Genetics)
असंतुलित आहार व पोषणाची कमतरता
अति तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन
सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर (Hair color, gel इ.)
अति जागरण आणि तणाव
डोक्यावर गरम पाण्याने अंघोळ करणे
वेळेवर झोप न घेणे
पाणी कमी पिणे
पचनशक्ती कमकुवत होणे
प्रश्न 3: केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय काय आहेत?
उत्तर: आयुर्वेदानुसार खालील उपाय फायदेशीर ठरतात:
स्वच्छता आणि केसांची निगा:
दर ४-५ दिवसांनी नैसर्गिक शाम्पू किंवा शिकेकाई वापरून केस स्वच्छ धुवावेत.
नारळ तेलात भृंगराज, ब्राह्मी, आवळा, वडाची पारंबी, जास्वंद इ. वनस्पती मिसळून केलेले तेल केसांना लावावे.
नियमितपणे केसांच्या मुळाशी मसाज करावा.
आहार व दिनचर्या:
तिखट, तेलकट, मसालेदार व मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
रोज ताजं आणि शाकाहारी आहार घ्यावा.
पुरेशी झोप आणि तनावमुक्त दिनचर्या ठेवावी.
पचनशक्ती सुधारण्यासाठी त्रिफळा, आवळा, ब्राह्मी, निंब चूर्ण वापरावे.
उपयुक्त औषधे व रसायन:
च्यवनप्राश रोज सकाळी सेवन करावा.
गुलकंद, मोरावळा, आणि थंड प्रवृत्तीचे द्रव्य उपयोगात आणावेत.
डॉक्टरांच्या सल्ल्याने वात-पित्त-कफ संतुलित करणारे औषधोपचार सुरू करावेत.
शिवनेरी आयुर्वेद, मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर
डॉ. संजय गायकवाड (M.D. आयुर्वेद)
डॉ. प्राजक्ता गायकवाड (B.A.M.S., M.A. संस्कृत)
📍 पत्ता:
ऑफिस नं. 401, शिवाई-1 कमर्शियल सोसायटी, साने गुरुजी स्कूलजवळ, दांडेकर पूल, म्युनिसिपल कॉलनी, पुणे - 411030. (https://maps.app.goo.gl/eZkNkRqDc4WMJxKJ9)
📞 संपर्क:
+91 9175754823 | +91 9175754873
रोज सकाळी 9:00 ते रात्री 9:00 (रविवारसह)
Aarogya India Wellness Centre is a trusted Panchakarma centre. Try a natural Ayurvedic detox to clean your body, reduce stress, and improve your health Panchakarma center near me Our treatments are safe, gentle, and made just for you. The clinic is calm and caring. Come start your journey to better health with us today.
उत्तर द्याहटवा